लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, जिल्हय़ातील १ लाख ९९६ शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. दोन महिन्यांच्या कालाधीत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांपैकी ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात्यात ३९१ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम जमा करून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. पात्र शेतकर्यांपैकी १ लाख ९९६ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.
कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.- जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)