तालुक्यातील दरवर्षी तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे विसर्जनासाठी येणारे सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीकरिता यावर्षी महापुरामुळे लाखपुरी गावात गाळ साचला असल्याने विसर्जनासाठी लाखपुरी टाकळी येथील लहान पूल निश्चित करण्यात आला आहे.
येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी श्री गणेश मूर्ती विसर्जन असल्याने गुरुवारी मूर्तिज़ापूर ग्रामीण ठाणेदार जी. एस. पांडव यांनी लाखपुरी व टाकळी येथील आपत्कालीन पथक, स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करुन विविध उपाययोजना केल्या.
यावेळी ठाणेदार जी. एस. पांडव, पीएसआय बोरोकार, हेकॉ लांजेवार, पोकॉ खेडकर यांच्यासह श्री लक्षेश्वर संस्थान अध्यक्ष राजू दहापुते, पोलीस पाटील शकील पटेल, लाखपुरी तंटामुक्ती अध्यक्ष नजाकत पटेल, लाखपुरीचे पोलीस पाटील दिगंबर नाचने, स्वयंसेवक व आपत्कालीन पथकाचे सदस्य ओम बनभेरू, सूरज कैथवास, शेख वाजिद, सचिन तामसे, कैलास श्रीनाथ, रेहान पटेल, जितू कैथवास,वसीम पटेल, संजय सुरदुसे, प्रवीण सुरदुसे, शे. सलीम,जगन सुरदुसे, विजय तामसे आदी उपस्थित होते.
फोटो:
गणेश मंडळाच्या चार सदस्यांनाच परवानगी
शनिवार व रविवारला श्री गणेश मूर्ती विसर्जनाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या ४ सदस्यांनी व घरगुती दोन सदस्यांनी मूर्ती विसर्जनाकरिता यावे, लहान मुलांना आणू नये. सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामीणचे ठाणेदार गोविंद पांडव यांनी केले आहे.