शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

भूमी अभिलेख; अधिकारी-कर्मचार्‍यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:05 AM

शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड हडप प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी- कर्मचार्‍यांना भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे कारणे दाखवा  नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आठ कर्मचार्‍यांसह  अधिकार्‍यांनी खुलासे सादर केले असल्याने या प्रकरणातील  दोषींवर कारवाईस प्रारंभ झाला आहे. भूमी अभिलेखच्या  अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनासह फौजदारी  कारवाईचा बडगाही लवकरच उगारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआठ कर्मचार्‍यांनी केले खुलासे सादरदीड महिन्यांनंतर कारवाईला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड हडप प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी- कर्मचार्‍यांना भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे कारणे दाखवा  नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आठ कर्मचार्‍यांसह  अधिकार्‍यांनी खुलासे सादर केले असल्याने या प्रकरणातील  दोषींवर कारवाईस प्रारंभ झाला आहे. भूमी अभिलेखच्या  अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनासह फौजदारी  कारवाईचा बडगाही लवकरच उगारण्यात येणार आहे.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी  प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0  कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भू खंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी  अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या  संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणका त ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड कागदोपत्री हडपण्यात  आला. हे प्रकरण  ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. त्यानं तर दीड महिन्यांच्या कालावधीनंतर भूमी अभिलेख  विभागाच्या अधिकार्‍यांनी आठ कर्मचार्‍यांसह  अधिकार्‍यांना नोटीस बजावून त्यांचे खुलासे मागविले आहे त. या कर्मचार्‍यांनी खुलासे दिले असून, त्यांच्यावर निलंबन  व फौजदारी कारवाईस आता प्रारंभ होणार आहे.

एनआयसीचा अहवाल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अकोला यांनी सदर डाटा तपासणी  केली आहे. या तपासणीत सदर भूखंड कागदोपत्री केव्हा  हडपण्यात आला, हे अकोला कार्यालयाकडून सांगणे  कठीण असल्याचा अहवाल त्यांनी दिला असून, ही माहिती  पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयातूनच स्पष्ट होणार  असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे आता  हा डाटा पुन्हा पुणे येथे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर  कारवाई करण्यात येणार आहे.

दस्तावेजांची तपासणी करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर व  अमरावती येथील अधिकार्‍यांना बोलावल्याने गत महिन्या पासून त्यांच्याकडेच शासकीय दौरे झाले. त्यानंतर   वरिष्ठांच्या आदेशानुसारच अकोला  कार्यालयातील  अधिकारी-कर्मचार्‍यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. बहु तांश कर्मचार्‍यांनी त्यांचे खुलासे सादर केले आहेत. त्यामुळे  या प्रकरणात आता कार्यालयीन कारवाई सोबतच फौजदारी  कारवाईसही प्रारंभ होणार आहे.- योगेश कुळकर्णीउप-अधीक्षक, भूमी अभिलेख अकोला.