अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0.६८ हेक्टर जमीन शासनाच्या नावे करण्याची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने महसूल अधिकार्यांकडून गुरुवारी कृषी विद्यापीठाच्या जमिनीची पाहणी करण्यात आली. तसेच कृषी विद्यापीठाला सिसा उदेगाव शिवारातील पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाची जमीन शासनाच्या नावे करून, आणि या जमिनीचा सात-बारा शासनाच्या नावे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन), अकोल्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या कृषी विद्यापीठाच्या जमिनीची पाहणी महसूल विभागाच्या अधिकारी व तलाठय़ांनी केली. विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादन करण्यात येत असलेल्या जमिनीच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला सिसा उदेगाव शिवारातील पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांकडून कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे.
कृषी विद्यापीठाच्या जमिनीची महसूल अधिका-यांकडून पाहणी
By admin | Published: September 25, 2015 1:05 AM