यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असताना पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची पेरणी केली. परिसरातील हरभरा पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे; मात्र सतत ढगाळ वातावरणामुळे व पहाटे पडणारे दाट धुके अशा हवामान बदलामुळे या पिकाला चांगलाच फटका बसत आहे. नया अंदुरा परिसरात महागड्या औषधांची फवारणी करूनसुद्धा उपयोग होत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. (फोटो)
------
हरभरा, तूर पिकावर भिस्त होती; मात्र ढगाळ वातावरणामुळे करपा व अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके धोक्यात सापडली आहेत.
- अंबादास साबळे, शेतकरी, नया अंदुरा.