प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याचा मुलगा शहरातील एका रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याला सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मुलाला रसमलाई खाण्याची इच्छा झाल्याने तक्रारकर्त्याने मुलासाठी राठी पेडेवाल्याच्या दुकानातून रसमलाई खरेदी केली. मुलाला देण्यासाठी लसमलाईचा डब्बा उघडताच त्यात अळ्या आढळल्याने तक्रारकर्त्यांला धक्का बसला. या प्रकरणी तक्रारकर्त्याने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नसल्याने हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे वळते करण्यात येणार असल्याचे सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे ठाणेदार मडावी यांनी दिली. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाला या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी राठी पेढेवाले येथील रसमलाईचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
पोलिसांमार्फत अद्यापही तक्रार मिळाली नाही, परंतु प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध विभागामार्फत राठी पेढेवाले यांच्या दुकानातील रसमलाईचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
- रावसाहेब वाकडे, अन्न निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन
नमुन्यांच्या