लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही दिवसांपासून जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज कर ताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमधील संवर्ग ३ व ४ मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी आता अखेरची संधी देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर ही अं ितम तारीख आहे. जिल्हय़ामध्ये सध्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, शिक्षकांच्या अनेक कागदपत्रांची पडताळणी होत नाही. अनेक बोगस दिव्यांग शिक्षकांनी पड ताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अनेक निर्दोष शिक्षकांना ‘खो’ मिळाला आहे. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीची बदली प्रक्रिया रद्द करून, ती समुपदेशन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. जिल्हय़ांतर्गत बदलीसंदर्भात शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शिक्षकांवर मोठय़ा प्रमाणात अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी बनविण्यात आलेले सॉफ्टवेअर चुकीचे असून, त्यात दुरुस्ती करण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली. तसेच ऑनलाइन बदली प्रक्रियाच रद्द करून, जुन्याच समुपदेशन पद्ध तीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात यावी. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार जि.प. मु ख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकार्यांनाही नसल्यामुळे या त प्रचंड घोळ निर्माण झाले आहेत. आता संवर्ग ३ व ४ मधील शिक्षकांना जिल्हय़ांतर्गत बदलीसाठी २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली आहे. २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत ट्रान्सफर पोर्टलमध्ये उपलब्ध माहितीवर बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना खो मिळाला आहे; परंतु त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज भरलेला नाही, अशा शिक्षकांच्या रँडम पद्धतीने पसंतीक्रम भरून न घेता, संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून बदल्या करण्यात येणार आहेत.
नाहीतर बदली प्रक्रियेतून व्हाल बाद!उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबर रोजी संवर्ग ३ व ४ मधील ज्या शिक्षकांनी आपले अर्ज भरून पडताळणी केली होती, अशा सर्व शिक्षकांचे अर्ज संगणक प्रणालीमध्ये त पासल्या गेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचे अर्ज पुन्हा त पासून पडताळून घ्यावेत. नाहीतर त्यांचे अर्ज बदली प्रक्रियेसाठी ग्राहय़ धरले जाणार नाहीत, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.