नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १: राज्यात रोजगार, शिक्षण तथा व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असून २0१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल ४१ हजार ७१६ नागरिकांनी विविध कारणांसाठी इतर जिल्हे, राज्य व देश पातळीवर स्थलांतर केले असल्याचे राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार निदर्शनास आले. स्थलांतराला रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी मुख्य कारणे आहेत. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बर्याच वेळा मनुष्यावर स्थलांतर करण्याची वेळ येते. यावेळी कामाच्या शोधात मनुष्य स्वत: किंवा कुटुंबासह इतर जिल्ह्यात, राज्यात व देशाबाहेर स्थलांतर करतो. बर्याच वेळा स्थलांतरित व्यक्ती स्थलांतर झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्याला राहतो. यात मजूर किंवा शासकीय नोकरदार वर्गाचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. तर यात विवाहित पुरुष-स्त्रियांची संख्या उल्लेखनीय आहे. भारतीय जनगणनेच्या आधारावर राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालन विभागाकडे याबाबत नोंदणी दरवर्षी अद्यावत केली जाते. यानुसार २0१५- १६ या आर्थिक वर्षात ४१ हजार ७१६ नागरिकांची स्थलांतरित म्हणून नोंदणी करण्यात आली. यात ग्रामीण २२ हजार ४५0 तर शहरी १९ हजार २६५ नागरिकांचा समावेश आहे. तर यात पुरुष १६ हजार ७६४ असून स्थलांतरित झालेल्या स्त्रिायांची संख्या २४ हजार ९५२ एवढे आहे, हे विशेष.महिलाचे स्थलांतर जास्तभारतीय रुढीनुसार, विवाहानंतर मुलगी तिच्या पतीच्या घरी जाते किंवा रोजगाराच्या शोधात पतीसोबत पत्नी जाण्याचे कारणही आहे, याआधारे अहवालानुसार स्थलांतरीत महिलांची संख्या जास्त दर्शविण्यात आली आहे. यात विवाह कारणातून ग्रामीण भागात १0 हजार ६९१ तर नागरी भागातून ४ हजार १७७ अशा एकूण १४ हजार ७५४ स्त्रियांनी वर्षभरात स्थलांतर केल्याची नोंदणी आहे. या तुलनेत वर्षभरात विवाहकारणातून स्थलांतर झालेल्या पुरुषांचा आकडा केवळ ११४ एवढा आहे.स्थलांतराच्या कारणांचा आलेखकारण स्त्री - पुरुषरोजगार ६९0५व्यवसाय १९३शिक्षण ६0४विवाह १४८६८जन्मानंतर ५१0९कुटुंबासह ७१८८इतर ६८४८
गत आर्थिक वर्षांत ४१ हजार नागरिकांनी केले स्थलांतर!
By admin | Published: September 02, 2016 1:04 AM