अकोला : महापालिक ा स्थायी समितीचे सभापती विनोद मापारी यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ २९ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी शेवटची सभा आयोजित केली असता ती अनपेक्षितपणे वादग्रस्त ठरली. मनपातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन साहित्य लावण्याचा कंत्राट आणि बडतर्फ कर्मचाºयाला पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या विषयांवर सभापती विनोद मापारी यांनी भूमिका स्पष्ट न केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या शिवसेनेकडून खुर्च्यांची फेकफाक करण्यात आली. यावेळी सेनेच्यावतीने सभापतींवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्याचे दिसून आले.मनपात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. त्यामध्ये स्थायी समितीचे सभापती विनोद मापारी यांचाही समावेश आहे. शुक्रवारी सभापती विनोद मापारी यांनी आयोजित केलेल्या सभेमध्ये मनपा कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन साहित्य लावण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे, मुख्य रस्त्यांवर साहित्य विक्री करणारे फेरीवाल्यांकडून दैनंदिन शुल्क वसुलीसाठी कंत्राटदार नियुक्त करणे, घंटा गाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणालीसाठी निविदेला मंजुरी देणे, आऊटसोर्सिंगनुसार मनपाला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यांसह बडतर्फ कर्मचारी गणेश चव्हाण याच्या अपिल अर्जावर निर्णय घेणे आदी विषयांचा समावेश होता. विद्युत साहित्य लावण्याच्या विषयावर कोणतीही चर्चा न करता हा विषय बाजूला का सारण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेचे सदस्य मंगेश काळे यांनी सभापती विनोद मापारी यांच्यासह विद्युत विभाग प्रमुख अमोल डोइफोडे यांना जाब विचारला. सभापती समाधानकारक खुलासा करीत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या मंगेश काळे यांनी खुर्च्यांची फेकफाक करीत सभागृहातून निघून जाणे पसंत केले.पार्किंगच्या मुद्यावर भाजपमध्येच मतभेदप्रशासनाने गांधी रोडवरील कवच संकुलच्या मागील रस्त्यावर पार्किंग कशी प्रस्तावित केली, त्याऐवजी गांधी-जवाहर बागेलगतच्या मैदानात पार्किंग द्या, अशी मागणी भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी केली. त्यावर सभापती मापारी यांनी युक्तिवाद केला असता, पार्किंगच्या मुद्यावर भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले.
काळे म्हणाले मग बोलावता कशासाठी?मनपा कार्यालयात विद्युत साहित्य लावण्यासंदर्भात प्रशासनाकडे इत्थंभूत माहिती उपलब्ध असताना विषयाला मंजुरी का दिली नाही, जर तुम्हाला तुमच्या मर्जीने सभा चालवायची असेल तर आम्हाला कशासाठी बोलावता, असा संतप्त सवाल मंगेश काळे यांनी केला.गजानन चव्हाण यांच्याक डून आरोपांच्या फैरीबडतर्फ कर्मचारी गणेश चव्हाण याला पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा विषय पटलावर आला असता सेनेचे सदस्य गजानन चव्हाण यांनी स्थायी समितीने यापूर्वी शिक्षण विभागातील कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली होती. त्या कर्मचाºयाला सेवेत घेण्याची मागणी केली. ही मागणी सभापती मापारी यांनी फेटाळून लावली असता, गजानन चव्हाण यांनी सभापतींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यावर मापारी यांनी प्रत्युत्तर दिले.
विद्युत साहित्याच्या मुद्यावर प्रशासनाने अर्धवट माहिती सादर केल्याने संबंधित कर्मचाºयाचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले. तसेच बडतर्फ कर्मचाºयाच्या संदर्भात सेना सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे औचित्य नव्हते. शिक्षण विभागातील कर्मचाºयाचे निलंबन ही प्रशासकीय बाब आहे.- विनोद मापारी स्थायी समिती सभापती, मनपा