अकोला : अकोला-पूर्णा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून एक दशक होऊनदेखील या मार्गावरील वाशिम, हिंगोली, वसमत येथील प्रवाशांनाा मुंबईला जाण्यासाठी एकही स्वतंत्र रेल्वे सुविधा नाही. हे लक्षात घेता अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे चालवून पूर्णा येथे नंदीग्राम एक्स्प्रेसला कनेक्टिव्हिटी देण्यात यावी, अशी मागणी अकोला-पूर्णा-नांदेड रेलवे प्रवासी संघाने केलीआहे.अकोला-पूर्णा नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे अकोला येथून दुपारी २ वाजता सोडण्यात यावी. ही गाडी सायंकाळी ५ वाजता पूर्णा येथे पोहोचेल. या गाडीने पूर्णा येथे पोहचणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी ५.३५ ला पूर्णा स्थानकावर येणाºया नंदीग्राम एक्स्प्रेसला कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यात यावी. परतीच्या प्रवासात पूर्णा येथे पहाटे ३.५० वाजता नंदीग्राम एक्स्पे्रसने पोहोचलेल्या प्रवाशांसाठी पूर्णा-अकोला कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे पूर्णा येथून पहाटे ४.३० वाजता सोडण्यात यावी. ही गाडी सकाळी ७.३० वाजता अकोला रेल्वेस्थानकावर येईल. यामुळे या मार्गावरील पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम व अकोला येथील प्रवाशांना सुविधा होईल, असे निवेदनात म्हटले आहे. वाशिम, हिंगोली, वसमत रिसोड, पुसद, कनेरगाव, कळमनुरी, औंढा इत्यादी शहरांतून दररोज हजारोच्या संख्येने मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक इत्यादी शहरांना जाणाºया प्रवाशांच्या सोयीसाठी अकोला-पूर्णा नंदीग्राम कनेक्टव्हिटी विशेष रेल्वे तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे प्रवासी संघाने दिला आहे.