बुलडाणा: ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने विविधमागण्यांकरिता जिल्हा परिषदसमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्व पक्षीयनेत्यांनी सोमवारी व मंगळवारी भेटी दिल्या.संगणक परिचालकांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणेच सुविधा देण्यात याव्यात,टास्क कनफरमेशन ही जाचक अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे सहा हजार रूपयेवेतन देण्यात यावे, संग्राम प्रकल्पामध्ये त्यांना सामाावून घेण्यातयावे, आदि मागण्यांकरिता उपोषण सुरू आहे. या उपोषणाला स्वाभिमानीचेनेते रविकांत तुपकर व आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.रविकांत तुपकर व आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारीअधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंदणसिंग राजपुत व जि.प.अध्यक्षा उमाताई तायडेयांच्याशी चर्चा करुन जि.प. स्तरावरील संगणक परिचालकांचे प्रश्नसोडविण्याच्या सूचना दिल्या.
संगणक परिचालकांच्या उपोषणाला नेत्यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:27 PM
बुलडाणा: ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदसमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी भेटी दिल्या.
ठळक मुद्देउपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी भेटी दिल्या.