चंद्रकांत अंधारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उन्हाळ्याच्या दिवसांत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सुवर्णा नदीपात्र कोरडेठण्ण पडले आहे. तसेच शिवारातील तलाव, पाणवठे आटल्याने पाळीव प्राणी व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तसेच बोर्डी नदी काठावर वसलेल्या चिंचखेड, बोडखा, पातूर भानोस, तुळजापूर, भंडाराज बु., भंडारज खु, बेलुरा बु., बेलुरा खु. या गावात गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच परिसरात अनेकांनी उन्हाळी पिकांची लागवड केली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पातूर तलावाचे पाणी बोर्डी नदीपात्रात सोडण्याची मागणी चंद्रकांत अंधारे यांनी निवेदनातून केली आहे. त्यानुसार, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी वैभव कुमार यांनी अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाकोडे यांना विशेष पत्र पाठविल्याची माहिती आहे.
पाळीव गुरे, वन्यप्राण्यांसाठी पातूर तलावाचे पाणी सोडा- अंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:17 AM