अकोला, दि. ४ : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी भाविक तयारीला लागले आहेत. सण आणि दिव्यांचा झगमगाट यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. गौरी-गणपतीची सजावट दिव्यांशिवाय अशक्य आहे. यंदाची आरास सजणार आहे, ती ह्यएलईडीह्णच्या दिव्यांनी. सध्या बाजारात एलईडीच्या दिव्यांची, माळांची चलती असून, यंदाच्या उत्सवात रोषणाईचा अनोखा झगमगाट अनुभवायला मिळणार आहे. संगीतावर ठेका धरणारे कारंजे, लायटिंगचे यूएसबी हेल्मेट, संकवाली झुंबर आणि नौरवापट्टा, पाण्यातील एलईडी कृत्रिम फुले हे यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. सण आणि उत्सवांमध्ये दिव्यांची आरास घर उजळून टाकते. गणेशोत्सवही त्याला अपवाद ठरत नाही. घराघरांमध्ये गणेशाच्या मोहक मूतीर्चे तेज दिसण्याकरिता मूर्तीभोवती दिव्यांच्या माळा अथवा सजावट करण्यावर अधिक भर दिला जातो. सार्वजनिक मंडळांनाही दिव्यांचे आकर्षण खुणावल्याशिवाय राहात नाही. मंडळांचा संगीताच्या तालावरील कारंजे आणि लायटिंगचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची पावले आपोआपच थबकतात. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी एलईडीच्या दिव्यांनी बाजारपेठ सजली आहे. पेनड्राइव्हसह कारंजे, अलाऊद्दीनचा चिराग, लायटिंगचे यूएसबी हेल्मेट, झुंबर या एलईडीच्या गोष्टी आकर्षण ठरत आहेत. कृत्रिम फुलांमध्ये एलईडीचे बल्ब बसवून तयार करण्यात आलेल्या फुलांनाही विशेष पसंती मिळत आहे. या फुलांमध्ये विविध रंगांचे दिवे असून, ही फुले पाण्यातही ठेवता येऊ शकतात. हात न लावताही माळांचे रंग आणि संगीत दुरूनही रिमोटच्या मदतीने बदलता येणार आहे. घरात कोठेही बसून दिव्यांची मजा अनुभवता येणार आहे. लखलखाटासोबतच वीज बचतबाप्पाच्या आगमनाचे वेध लागल्याने वातावरण अधिकच चैतन्यदायी झाले आहे. विद्युत माळांनी दुकाने सजली आहेत. बाजारपेठेत एलईडीच्या दिव्यांचा झगमगाट असून, आधुनिक, आकर्षक रंगसंगत, वीज बचत आणि कमी किमतीमुळे एलईडीला अधिक मागणी आहे. कारंजे, हेल्मेट आणि एलईडीचे झुंबर यंदाचे आकर्षण आहे. कारंज्याची किंमत एक हजार रुपयांपासून, तर हेल्मेटची किंमत सातशे रुपये आहे. एलईडी झुंबर अकराशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे. लाइटिंगच्या माळा २0 रुपयांपासून ते ५00 रुपयांपयर्ंत उपलब्ध आहेत.
गणेशोत्सवाला ‘एलईडी’ची आरास
By admin | Published: September 05, 2016 2:45 AM