शहरातील गांधी राेड परिसरातील प्रसिद्ध जैन मंदिरास मंदिर व्यवस्थापनाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिराला सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी मंदिर व ग्रंथालयाची पाहणी केली. ग्रंथालयातील अमूल्य ठेवा आणखी ५०० वर्ष कसा टिकवता येईल त्यासाठी सर्वताेपरी मदत करण्याचे आश्वासन आंबेडकर यांनी दिले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मनीभाई लाखटिया यांनी आंबेडकर यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच ट्रस्टमार्फत आयाेजित विविध कार्याची माहिती दिली. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष विशाल शाह, मंत्री राजू भंडारी, सदस्य महेंद्र देडिया, चेतन मेहता, राजू नगरिया, सुरेश दहेता, रजनीकांत शाह, प्रदीप शाह, प्रकाश भंडारी, कोटक शाह, जोनेद भादानी, मेध शाह, भावीश शाह, प्रवीण मोरे, हिमांशु पारेख, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, चंद्रशेखर पांडे, डॉ. प्रसन्नजीत गवई, गौतम गवई, पराग गवई, गजानन गवई आदी उपस्थित होते.
भगवान महावीर जैन यांच्या विचारांचा वारसा असाच चालत राहावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:44 AM