बाळापूर (अकोला) : शिकारीमागे धावत असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर बाळापूरनजीक २७ आॅगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातातबिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.सोमवारी रात्री एक बिबट शिकारीचा पाठलाग करीत असताना राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. त्यावेळी महामार्गावर भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक दिली. यामध्ये बिबट्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. सदर बिबट मादी जातीचा आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी बिबट्याचा पंचनामा केला. सध्या वन्य प्राणी गावाकडे येत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेचे उपाय नसल्याने अनेक वन्य प्राण्यांचा अपघातात मृत्यू होत आहे. सातरगाव परिसरात बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर होता. अपघातात ठार झालेला बिबट हा सातरगाव परिसरात आढळलेलाच असावा, असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वन विभाग करीत आहे. (शहर प्रतिनिधी)