ॲड.राजेश जाधव
अध्यक्ष - जिल्हा व सत्र न्यायालय बार असोसिएशन अकोला
.....
अपघातग्रस्त रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी अनेकदा धावपळ केली आहे. त्यामुळे रक्ताची टंचाई भासली, तर काय हाेऊ शकते, याची जाणीव आम्हाला आहे, म्हणूनच आम्ही रक्तदानासाठी पुढाकार घेताे, आपणही घ्या.
दीपक सदाफळे
संस्थापक संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक.
..............
कामगारांनी सदैव राष्ट्रविकासात माेलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे रक्तदानासारख्या पवित्र कार्यातही ते पुढाकार घेतात. ‘लाेकमत’च्या रक्तदान माेहिमेतही आम्ही अग्रेसर राहू.
आर.डी.गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त.
..........
रक्त हे कुठेही दुकानात न मिळणारे औषध आहे, त्याची उपलब्धता फक्त रक्तदानानेच पूर्ण करता येते, म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. चला करू या रक्तदान, वाचवू या अमूल्य प्राण!
डाॅ.आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय.
.................................
रक्ताचा तुटवडा असला, तर अनेक शस्त्रक्रिया अडचणीत येतात. रुग्णांचे प्राण वाचविणे कठीण हाेते. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे व रुग्णांना जीवनदान द्यावे.
डाॅ.मीनाक्षी गजभीये, वैद्यकीय अधिष्ठाता जीएमसी अकाेला.
....................
बच्चू कडू यांनी समाजकारणाचा मूलमंत्र दिला आहे. त्यामध्ये रक्तदानाचे महत्त्व त्यानी सदैव सांगितले आहे, ते स्वत: रक्तदान करतात, तीच भूमिका घेऊन आम्ही रक्तदानासाठी पुढाकार घेताे.
मनाेज पाटील, प्रहार सेवक
.................
एखाद्याचा जीव वाचविणे, यापेक्षा काेणतेही काम माेठे असून शकत नाही, रक्तदानातून ते शक्य हाेते. अशा कार्यात सर्वांनी हरिरीने पुढे आले पाहिजे.
ॲड.प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
...............
काेराेना काळात अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. आता काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे या शस्त्रक्रिया हाेतील. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी सर्वानी रक्तदानात सहभागी व्हावे.
आ.अमाेल मिटकरी