- नितीन गव्हाळेअकोला: वाचन-लेखन, गणित विषयामध्ये कच्चे असलेल्या इयत्ता सहावी-आठवीतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर सुधारावा, त्यांना मूलभूत वाचन आणि गणितीय क्रिया करता यावी, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रम १ डिसेंबर २0१८ ते ३१ मार्च २0१९ दरम्यान जिल्हा परिषद, न.प. व खासगी अनुदानित अशा २७२0 शाळांमध्ये राबविणार आहेत. त्यांतर्गत राज्यातील २ लाख २९ हजार ७१७ विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी होईल.विद्या प्राधिकरण पुणे मराठी विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील कमकुवत सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी स्तराधारित अध्ययक संकल्पना (एलबीएल) कार्यक्रम २0१८-१९ साठी निश्चित केला आहे. इयत्ता सहावी ते आठवीत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची वाचन-लेखन क्षमता कमी असते. इतर विषयांमध्येसुद्धा विद्यार्थी मागे पडतात. त्यामुळे या मुलांना कसे शिकवावे, असा प्रश्न शिक्षकांना सतावतो. ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी नैदानिक चाचणी घेण्यात येईल. त्यात प्राप्त गुणांनुसार विद्यार्थ्यांना चार स्तरात विभागण्यात येईल. चारही स्तरावरील विद्यार्थ्यांपैकी पहिल्या स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित किमान ९0 दिवस ४५ मिनिटे त्यांचे अध्ययन घेऊन त्यांच्या अध्ययन स्तरात वाढ करण्यासाठी ‘लेव्हल बेस लर्निंग’ (एलबीएल) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एससीईआरटी’कडून विद्यार्थ्यांना नैदानिक चाचणी प्रश्नपत्रिका व लाभार्थी विद्यार्थ्यांना माझी पुस्तिका भाषा-१ (मराठी) देण्यात येईल.‘एलबीएल’साठी ३२४३ शिक्षकांचे नियोजन‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रमादरम्यान प्रत्येक ४0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा पद्धतीने ३ हजार २४३ शिक्षक वाचन-लेखन, गणित विषयाचे अध्ययन करतील. त्यासाठी ९0 दिवसांचा कालावधी राहील, तसेच शिक्षकांमागे ३२४ मेंटॉर निवडण्यात आले आहेत. त्यासाठी मेंटॉर यांना सप्टेंबर महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
विदर्भातील शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी!नांदुरा (बुलडाणा)- ३८0३बाळापूर (अकोला)- ३९२९मालेगाव (वाशिम)- ३७९१धारणी (अमरावती)- ४५१३झरी (यवतमाळ)- ११00रामटेक (नागपूर)- २८१६आर्वी (वर्धा)- २१९७जिवती (चंद्रपूर)- ८५३लाखांदूर (भंडारा)- २५५३
वाचन-लेखन, गणिताचा कच्चा पाया असणाºया मुलांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी राज्यातील ३४ तालुक्यांसाठी ‘एलबीएल’ हा कार्यक्रम दिला आहे. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील ३९२९ विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी आम्ही सुलभकांचे (मेंटॉर) प्रशिक्षण घेण्यात आले आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत अकोल्यात प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात हा ‘एलबीएल’ कार्यक्रम होईल.- जितेंद्र काठोळे, राज्य मार्गदर्शक‘एलबीएल’ कार्यक्रम.