जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच महागाईच्या तडक्याने नागरिक हैराण झाले आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. काही दिवसांपासून सातत्याने इंधनाचे दर वाढत असून, स्पीड पेट्रोलचे दर प्रती लिटर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. साधे पेट्रोल आणि डिझेलचे दरही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याने नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
--बॉक्स--
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
जेव्हा ९८ रुपये देऊन पेट्रोल खरेदी करता तेव्हा ते पेट्रोल कंपन्यांना जात नाही, तर पेट्रोलच्या विक्री दरापैकी ६० टक्के किंमत ही केंद्र आणि राज्य सरकारच्या करावर अवलंबून असते. एक लिटर पेट्रोलची बेस प्राईज कमी आहे. त्यावर केंद्राची एक्साइज ड्यूटी ३२.९० रुपये, राज्य सरकारचा व्हॅट २६ टक्के, वाहतूक खर्च, डीलर कमिशन असते. त्यामुळे पेट्रोलची किमत ९८.३० रुपयांवर पोहोचते.
--कोट--
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार
पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. आधीच रोजगार नाही, त्यात या दरवाढीने आर्थिक फटका बसत आहे. नाइलाजाने वाहनात पेट्रोल भरावे लागत आहे. पुढे सायकलवर फिरावे लागण्याची वेळ येणार आहे.
- आशिष जाधव
--कोट--
डिझेलचे दर वाढल्याने यांत्रिक शेती मशागत महागली आहेत. कोरोनाच्या संकटात काळात महागाईच्या जात्यात सर्वसामान्य भरडले जात आहेत. पुढे खरीप हंगाम असल्याने दरवाढ आर्थिक संकटात लोटणारी आहे.
- रमेश गवई
--कोट--
पेट्रोल - डिझेलचे दर सतत वाढत असल्याने मोठा फटका बसत आहे. एकाच महिन्यात सलग सहा वेळेस दरवाढ झाली. त्यामुळे वाहन वापरणेही अवघड झाले आहे.
- रवींद्र भवाने
--पॉईंटर--
पेट्रोल दर (प्रती लिटर)
१९९१ ९.६२
२००१ ३०.०५
२०११ ५८.३७
मे २०२१ ९८.३०