अकोला, दि. 0२- अकोला वन्यजीव सप्ताहानिमित्त रविवारी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला शेकडो विद्यार्थ्यांंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिमुकल्यांनी आपल्या बाल कल्पकतेने वन्य प्राण्यांचे जीवन रंगवून काढले. नेहरू पार्कमध्ये आयोजित ही स्पर्धा ऐनवेळी कुणबी समाज विकास मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली.वन्यजीव सप्ताहानिमित्त रविवारी सकाळी ८ ते १0 वाजेपर्यंंत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १ ते ४ इयत्ताच्या गटासाठी वनातील पहाट, ५ ते ७ इयत्ताच्या गटासाठी शेजारील वन्यप्राणी, ८ ते १0 इयत्ताच्या गटासाठी मानवी जीवन आणि वन्यप्राणी असे विषय ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक पाऊस आल्याने नेहरू पार्कमध्ये उघड्यावर ठेवण्यात आलेल्या स्पर्धेचे ठिकाण जवळच असलेल्या कुणबी विकास सभागृहात हलविले गेले. जवळपास दोनशे विद्यार्थ्यांंंनी यामध्ये सहभाग नोंदविला. सहायक वनसंरक्षक एस. पी.गाढे, आरएफओ जी.एम. भगत, वनपाल एच.जी. डांगे, सपर्मित्र बाळ काळणे, वनरक्षक आर. आर. बिरकड, गोविंद पांडे, चित्रकला प्रशिक्षक गजानन घोंगडे, बोबडे, संजय आगाशे, स्नेहा नागापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. याच वेळी स्पर्धेतील सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांंची नावे जाहीर करण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आयोजित कार्यक्रमातून सर्वांंंना सन्मानित करण्यात येणार आहे.
चिमुकल्यांनी रंगविले वन्य प्राण्यांचे जीवन
By admin | Published: October 03, 2016 2:36 AM