तालुक्यातील सकाळपासूनच ढग दाटले होते. अवकाळी पाऊस बरसणार असल्याच्या अंदाज घेऊन शेतकऱ्यांची शेतात सोंगून ठेवलेला हरभरा झाकण्याची एकच धांदल उडाली होती. सकाळी अचानक अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक शिवारांमध्ये शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेला हरभरा काही प्रमाणात भिजला. तसेच वादळवाऱ्यामुळे काही गावांमध्ये गव्हाचे नुकसान झाले. सध्या हरभरा, गहू पिक काढणीस आले आहे. शेतकऱ्यांची गहू, हरभरा सोंगणीची लगबग सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील हरभरा पिकांची सोंगणी करुन शेतात ठेवला आहे. मात्र अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे सोंगलेला हरभरा ओला झाला. वादळवाऱ्यामुळे आंब्याचे सुद्धा नुकसान झाले. कृषी विभागाने १६ ते २२ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
फोटो: