अकोला : रापमच्या अकोला विभागात २७ चालकांना रंग अंधत्व असल्याचे दाखवून सुरक्षारक्षक म्हणून पर्यायी सेवेत सामावून घेण्याचा गैरव्यवहार झाला असून, मुंबईच्या केंद्रीय अधिकार्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने अकोल्यात तळ ठोकला असून, दोन दिवसांपासून कसून सुरू असलेल्या चौकशीमध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मंगळवारी चौकशी समिती अधिकारी आर.एम. मुडीवाले यांच्याशी बातचीत केली असता, या प्रकरणात काही धागेदोरे हाती लागले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ह्यलोकमतह्णकडे व्यक्त केली. अधिकार्यांच्या वरदहस्ताने जे चालक सुरक्षा रक्षकपदी कार्यरत आहेत अशांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. बस चालकाने रंग अंधत्वाचा पुरावा सादर केल्यास, त्यास कामावरून कमी न करता सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्याचे प्रावधान एसटी महामंडळात आहे. यासाठी त्या चालकास एसटी महामंडळाने ठरवून दिलेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकार्याकडे नेत्र तपासणी करून रंग अंधत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. एसटी महामंडळाने याबाबतचे परिपत्रक जाहीर करताच वर्ष २0१३-१४ या आर्थिक वर्षात अकोला विभागातील एक-दोन नव्हे तर तब्बल २७ बस चालकांनी अधिकार्यांच्या वरदहस्ताने रंगअंधत्वाचे प्रमाणपत्र सादर करून सुरक्षारक्षकांच्या जागा बळकावल्या. तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, कर्मचारी अधिकारी रमेश एडके यांच्या कार्यकाळात घडलेल्या या प्रकरणात अधिकार्यांनी आपले खिसे भरले असल्याचा आरोप एसटी महामंडळाच्या अधिकृत कामगार संघटनेसह इतर संघटनांनीदेखील केला होता.
अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता
By admin | Published: August 26, 2015 1:39 AM