लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कांद्याचे दर नियंत्रित राहावे, यासाठी कांदा साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. साठवणुकीच्या मर्यादेचे उल्लंघन करून कांद्याचा काळाबाजार होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार आणि सहकार विभागाच्या सहायक निबंधकांना ५ डिसेंबर रोजी दिला.कांद्याचा तुटवडा आणि वाढते दर नियंत्रित ठेवण्यासाठी शासन आदेशानुसार कांदा साठवणुकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार होलसेल विक्रेत्यांसाठी ५० मेट्रिक आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी १० मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा आहे. त्यानुसार जिल्ह्यात कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि मर्यादेपेक्षा जास्त कांद्याची साठवणूक होऊ नये, याकरिता साठवणुकीच्या मर्यादेचे उल्लंघन करून कांद्याचा काळाबाजार करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार व सहकार विभागाच्या सहायक निबंधकांना दिला.कांद्याचे दर नियंत्रित राहावे आणि मर्यादेपेक्षा कांद्याची साठवणूक होऊ नये, यासाठी कांदा साठवणुकीची तपासणी करण्याचा आदेश जिल्ह्यातील तहसीलदार व सहकार विभागाच्या सहायक निबंधकांना दिला आहे. मर्यादेपेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करून काळाबाजार करण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.- नरेंद्र लोणकरप्रभारी जिल्हाधिकारी