अकोला : महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्यानंतर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी नसलेल्या शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बँकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ नसलेल्या शेतकºयांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात येणार आहेत. त्यानंतर बँकांमार्फत संबंधित शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्यात येणार आहेत. खाते क्रमांकाशी आधार क्रमांक ‘लिंक’ केल्यानंतर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.‘आॅडिटर’कडून होणार याद्यांची तपासणी!महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत. कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया १ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी शेतकरी याद्यांची तपासणी शासकीय लेखा परीक्षकांमार्फत (आॅडिटर) करण्यात येणार आहे.
आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 10:57 AM