अकोला, दि. २0- जिल्हय़ातील १२१ रेतीघाटांचा लिलाव करण्यास अमरावती विभागीय आयुक्तांनी १७ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार मान्यता मिळालेल्या रेतीघाटांचा लिलाव करण्याची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. या रेतीघाटांच्या लिलावातून १६ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या जिल्हय़ातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरच्या अखेरीस संपत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी जिल्हय़ातील रेतीघाटांच्या लिलावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ात २४३ रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले. संबंधित रेतीघाटांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आला. सर्वेक्षण अहवालानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ातील रेतीघाटांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हय़ातील १२१ रेतीघाटांचा लिलाव करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी गत १७ सप्टेंबर रोजी दिला. विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म विभागामार्फत १२१ रेतीघाटांच्या लिलावाची तयारी सुरू करण्यात आली. त्यामध्ये लवकरच रेतीघाटांच्या लिलावासाठी ऑनलाइन निविदा मागविण्यात येणार आहेत. या रेतीघाटांच्या लिलावाची किंमत १६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, या रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला १६ कोटींचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.असे आहेत घाटअकोला २९आकोट १0तेल्हारा २१बाळापूर २२पातूर 0३मूर्तिजापूर ३१बाश्रीटाकळी १५
रेतीघाटांच्या लिलावास आयुक्तांची मान्यता!
By admin | Published: September 21, 2016 2:01 AM