लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव शेतशिवारात कुसूम मारोती घाटोळ यांच्या शेतशिवारात २0 फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत ११ ऑक्टोबर रोजी काळवीट पडल्याने जखमी झाले होते. त्याला ग्रामस्थांच्या पुढाकाराने व वन विभागाच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले आहे.विहिरीत काळवीट पडल्याची बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी अकोला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांना त्याबाबत सांगितले. त्यांच्या र्मगदर्शनात वनपाल पी. बी. गीते, वनरक्षक बी. एम. शिरभाते, घुगे, अनिल जाधव, सर्पमित्र शेख मुन्ना, सागर बोकसे, चंद्रशेखर आदींना घटनास्थळी पाठवून मोठय़ा शर्थीने कळविटाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. त्याला कोठे मार लागलेला आहे, ते पाहिले आणि त्याला उपचारासाठी अकोला वन विभागात नेण्या त आले.
कोरड्या विहिरीत पडलेल्या कळविटाला दिले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 7:41 PM
वाडेगाव : अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव शेतशिवारात कुसूम मारोती घाटोळ यांच्या शेतशिवारात २0 फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत ११ ऑक्टोबर रोजी काळवीट पडल्याने जखमी झाले होते. त्याला ग्रामस्थांच्या पुढाकाराने व वन विभागाच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले आहे.
ठळक मुद्देवन विभागाचे अधिकारी पोहोचले वाडेगावात!२0 फूट खोल विहिरीत पडल्याने काळवीट जखमी