शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:57 AM

अकोला : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार असल्याचे आश्‍वासन पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना  दिले. या विषयावर राज्यमंत्री खोतकर यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. मंडळ हलविले नसून, पदे रिक्त असल्याने सध्या मंडळाचा अतिरिक्त पदभार पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

ठळक मुद्देआ. बाजोरिया यांना ना. खोतकर यांचे आश्‍वासनपदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे पदे भरेपर्यंंत पुण्याहून मंडळाचे कामकाज चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार असल्याचे आश्‍वासन पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना  दिले. या विषयावर राज्यमंत्री खोतकर यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. मंडळ हलविले नसून, पदे रिक्त असल्याने सध्या मंडळाचा अतिरिक्त पदभार पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.  पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुण्याला हलविण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. त्यासाठीच या कार्यालयाला कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचे टाळण्यात येत होते. मध्यंतरी मुख्य कार्यकारी  अधिकारी दिला; पण सध्या सर्व अधिकारी सेवानवृत्त झाले आहेत. पदे भरेपर्यंंत पुण्याहून मंडळाचे कामकाज चालणार आहे.विदर्भातील पशुधनाचा विकास तसेच राज्यातीलही पशुधनाचा विकास होण्यासाठी या मंडळाची अकोला येथे स्थापना करण्यात आली आहे.  शेतकरी आत्महत्यांच्या सत्रानंतर केंद्र व राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी भरघोस निधीची उपलब्धता या मंडळाला करण्यात आली होती. त्यातून अनेक पशुधनासाठीच्या योजना राबविण्यात आल्या होत्या.  पॅकेज असेपर्यंंत या मंडळावर काही काळ मुख्य कार्यकारी पद कायम होते. पॅकेज संपताच हे पद रिक्त झाले. त्यानंतर बर्‍याचदा मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रभारी म्हणून काम बघितले; परंतु महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येत असल्याने ‘लोकमत’ने त्यावेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पद भरण्यात आले; परंतु ते अधिकारी कायम येथे राहत नसल्याने पुण्याहून हा कारभार चालत असल्याचा आरोप होत होता, तसेच मुख्यालय हालचालीचे अनेक वेळा प्रयत्न झाले. २0१५ मध्ये हे कार्यालय पुण्याला जाणार होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शिवसंग्रामचे नेते शिवा मोहोड यांनी आंदोलन केले होते. सध्या हे मुख्यालय अकोला येथेच राहणार असले, तरी शेतकरी हिताच्या योजना राबविण्यासाठी येथे कायमस्वरू पी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याची मागणी होत आहे.