शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

अकोलेकरांना भारनियमनाचे चटके; भाजपाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 2:00 PM

कोणत्याही परिस्थितीत सायंकाळनंतर भारनियमन न करण्याचे निर्देश गुरुवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांना दिले.

अकोला : ऐन सणासुदीच्या काळात महावितरण कंपनीकडून जुने शहरात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांसाठी कोळशाचा पुरवठा होत नसून, तुटवडा निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे चित्र समोर आले आहे. ही समस्या तातडीने निकाली काढून कोणत्याही परिस्थितीत सायंकाळनंतर भारनियमन न करण्याचे निर्देश गुरुवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांना दिले. यावेळी भाजपाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.नवदुर्गा उत्सवाला सुरुवात होताच जुने शहर व इतर भागात महावितरण कंपनीच्यावतीने अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांमध्ये कंपनीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांची ओरड लक्षात घेता गुरुवारी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी महावितरण कार्यालयात धाव घेऊन अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांची भेट घेतली. वीज निर्मिती करणाºया प्रकल्पांना कोळशाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसून, तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाल्याचे अधीक्षक अभियंता कछोट यांनी सांगितले. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश आ. गोवर्धन शर्मा यांनी दिले. याप्रसंगी नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, विनोद मापारी, सुनील क्षीरसागर, अनिल गरड, अमोल गोगे, श्याम विंचनकर, धनंजय गिरीधर, प्रशांत अवचार, राजेश चौधरी, दिलीप मिश्रा, वैकुंठराव ढोरे, एकनाथ ढोरे, रमेश करीहार, बबलू पळसपगार, बबलू सावंत, अनुप गोसावी आदी उपस्थित होते.वीज वाहिनीचा मार्ग मोकळा करा!गोरक्षण रोडच्या कामाला अडथळा ठरणारे जुने विद्युत खांब त्वरित हटवून गोरक्षण रोडप्रमाणेच डाबकी रोडवरील जोगळकेर प्लॉटमध्ये उभारलेल्या नवीन पोलवरील वीज वाहिनीचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी दिले. नागरिकांनी शुल्क जमा करूनही त्यांना विद्युत मीटर व विद्युत पुरवठा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असून, हा तिढा तातडीने निकाली काढण्याची सूचना आ. शर्मा यांनी केली.--फोटो- ११ सीटीसीएल- ०७--

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणBJPभाजपा