सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगावातील ८३ आर जमिनीवर अतिक्रमण करण्यासोबतच ती तारण ठेवून कर्ज घे तल्याचाही प्रकार उघड झाला आहे. पुसद अर्बन बँकेच्या खामगाव शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या पत्रानंतर जिल्हा परिषदेने शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्सच्या तीन भागीदारांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याचे बजावले आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर बँकेने जिल्हा परिषदेला पत्र पाठविले.जिल्हा परिषदेच्या मालकीची जमीन खामगाव रोडवर असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी अर्थसंकल्पीय सभेत सांगितले होते. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी शोध घेतला. सर्व्हे क्रमांक ३४३ मधील एकूण क्षेत्रात ८३ आरचा पोटहिस्सा जिल्हा कौन्सिल अकोलाच्या नावे आहे. त्याच्या आजूबाजूने मोठय़ा प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. त्या जागेची च तु:सीमा आणि सीमांकन करून देण्यासाठी भूमिअभिलेख, तहसीलदार यांना पत्र पाठविले; मात्र दाद मिळाली नाही. सर्व्हे क्रमांकाच्या नकाशानुसार, खामगाव रस्त्यालगतचा हिस्सा जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे, तर त्यामागे इतरांचे पोटहिस्से आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या हिश्शात रस्त्यालगत मोठय़ा इमारतींचे बांधकाम झाले आहे. खुली जागा त्या इमार तीच्या मागे सोडण्यात आली आहे., हे विशेष.
जिल्हा परिषदेने दिली बांधकाम पाडण्याची नोटीसबँकेच्या पत्रातून या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम होत असल्याचे समजताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी तीनही भागीदारांना २५ सप्टेंबर रोजी नोटीस बजावली. त्यामध्ये सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवा, सोबतच अतिक्रमणाच्या जागेवर केलेले बांधकाम आठ दिवसांत पाडून टाकण्याचे म्हटले आहे. या प्रकाराने खडबडून जागे झालेल्या बँकेने जागेच्या प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी बँकेलाही नोटीस मिळावी, अशी मागणी पत्रातून केली आहे.
जागेवर हॉटेलचे बांधकामखामगाव रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर सध्या काही बिल्डर्सकडून हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या प्रकाराला पुसद अर्बन को-ऑप. बँकेने जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रातून दुजोरा मिळाला. बँकेच्या पत्रात जिल्हा परिषदेने नमूद केलेल्या विवरणातील भूमापन क्रमांक ३४३। ४ अ मधील ८१ आर जमिनीवर शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्स या भागीदारी फर्मला कर्ज दिल्याचे म्हटले आहे. त्यासाठी बँकेने तीन भागीदारांसोबत जमिनीचे गहाणखत केले आहे.
बालाजी असोसिएट्सचे भागीदारपुसद अर्बन बँकेकडे जमीन तारण ठेवून कर्ज घेताना गहाणखत करून देणार्यांमध्ये राजेश मदनमोहन मुना, संजय भगवानदास नागपाल दोघेही रा. धानुका ले-आउट रोड शेगाव, मीनाक्षी रामविजय बुरूंगले, धनगर फैल शेगाव यांचा समावेश आहे, तर बँकेकडून प्रभारी व्यवस्थापक विजय खांदवे यांची त्यावर स्वाक्षरी आहे.
शेगावातील जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषदेची कार्यवाही सुरू आहे. तहसीलदारानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी यांना प्रकरण सादर केले जाईल.- एम.जी. वाठ, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.