आकाेट तालुक्यातील पाेपटखेड येथील रहिवासी राम अनिल भास्कर, वय २२ वर्षे याच्याविरुद्ध गावठी हातभट्टीची दारू अवैधरीत्या तयार करणे, दारूची वाहतूक करणे तसेच दारूची अवैधरीत्या विक्री केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यासाेबतच हा गाेरखधंदा बंद करण्यासाठी त्याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ मात्र, या कारवायांना ताे जुमानत नसल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कठाेर कारवाई म्हणजेच एमपीडीए करण्याचा प्रस्ताव आकाेट ग्रामीण पाेलिसांकडून तयार करीत पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नीमा अराेरा यांच्याकडे सादर केला़ अराेरा यांनी त्यांच्या सूत्रांकडून या आराेपीची माहिती घेतली असता त्यामध्ये सत्यता असल्याने आराेपी राम अनिल भास्कर याला मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव २५ ऑगस्ट राेजी मंजूर केला़ त्यानंतर पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या आदेशाने आराेपीचा शाेध घेऊन त्यास कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे़ ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख संताेष महल्ले, मंगेश महल्ले, आकाेट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानाेबा फड, पाेलीस उपनिरीक्षक डाखाेरे व पाेलीस ठाण्यातील अंमलदार यांनी केली़
दारूभट्टी चालवणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:22 AM