अकोला : जीवघेण्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब व मजूर वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. घराची ओढ असल्यामुळे भर उन्हात परराज्यातील नागरिक शेकडो किलो मीटर अंतर पायी चालत कुटुंबासह शहरात दाखल होत आहेत. काही क्षण विश्रांती घेतल्यावर संबंधित नागरिक त्यांच्या राज्याकडे अक्षरश: पायी चालत रवाना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कोरोना विषाणूची साखळी खंडित व्हावी या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदीची मुदत वाढवली. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद,नाशिक,नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगाना, मध्यप्रदेश,छत्तीसगढ, पश्चिम बंगाल,बिहार, उत्तर प्रदेशमधील गरजू नागरिकांची मोठी संख्या आहे. टाळेबंदी जाहिर होताच सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने परराज्यातील नागरिकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कशाही परिस्थितीत स्वत:च्या गावी निघून जाण्याची ओढ निर्माण झालेल्या या नागरिकांनी चक्क पायी चालण्याचा पर्याय शोधला.केंद्र व राज्य सरकारने अशा नागरिकांची घरी जाण्याची व्यवस्था केली असली तरी जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे. शिवाय संवाद साधण्यासाठी भोषेची अडचण येत असल्यामुळे परराज्यातील नागरिकांनी पायी चालत जाण्याला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून परराज्यातील नागरिकांचे जत्थे त्यांच्या मुळ गावाकडे रवाना होत असल्याचे दिसत आहे.यावेळी कुटुंबातील महिला, लहान मुले भरउन्हात पायी चालत असल्याचे चित्र आहे.परराज्यातील नागरिकांची मनपाकडून तपासणीआंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार तसेच उत्तर प्रदेशकडे जाणाºया मजूर वर्गाची मोठी संख्या पहावयास मिळत आहे. महापालिका क्षेत्रात दाखल होणाºया संबंधित नागरिकांची जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाकडून नोंद करीत आरोग्य तपासणी केली जात आहे.डोक्यावर ओझे,हातात पाण्याची बॉटलदिवसभर प्रवास करणाºया परप्रांतीय नागरिकांच्या डोक्यावर ओझे,हातात पाण्याची बॉटल एवढेच साहित्य दिसून येते. रात्री महामार्गालगतच्या शेतामध्ये मुक्काम करून दुसºया दिवशी पहाटेच गावाकडे रवाना होतो. यादरम्यान,काही गावांमध्ये नागरिक किंवा प्रशासनाच्यावतीने जेवणाची तात्पुरती सोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.