पूर्व झाेनमधील रेल्वे गेट परिसरातील मालमत्ताधारक रामा एम्पीयर असो. सहकारी पतसंस्था यांच्याकडे २०१७ पासून ९० हजार ११५ रुपये कर थकीत हाेता. नवीन बस स्थानकामागील जैन चेंबर येथील दुसरा मजल्यावरील मालमत्ताधारक भाडेकरू मंगला दुबे यांच्याकडे २०१७ पासून २ लाख ८० हजार रुपये मालमत्ता कर थकीत हाेता. सिव्हील लाइन परिसरातील पूर्वा काॅर्नर येथील मालमत्ताधारक नवनीत लखोटिया व दिलीप अग्रवाल यांच्याकडे २०१४ पासून ते आजपर्यंत ७६ हजार ६४५ रुपये कर थकीत असल्याने संबंधिताच्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पूर्व झाेनचे क्षेत्रीय अधिकारी तथा कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात सहा. कर अधीक्षक देवेंद्र भोजने, कर वसुली लिपिक राजेश साळुंके, दीपराज महल्ले, रमाकांत बगरेट, दादाराव सदांशिव, श्रीकृष्णा वाकोडे, सुरक्षा रक्षक संगीता शिंदे यांनी केली.
तीन मालमत्तांना लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:24 AM