Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 06:01 PM2019-03-29T18:01:40+5:302019-03-29T18:12:23+5:30
११ उमेदवार रिंगणात कायम आहेत; मात्र भाजपा, काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे.
अकोला : अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ११ उमेदवार रिंगणात कायम आहेत; मात्र भाजपा, काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे.
देवानंद तोताराम इंगळे या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज २८ मार्च रोजी मागे घेतला. त्यामुळे आता ११ उमेदवार कायम आहेत. भारतीय जनता पार्टीचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल व वंचित बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. रिंगणातील इतर उमेदवारांमध्ये भाई बी.सी. कांबळे--बहुजन समाज पार्टी, अरुण वानखडे—पीपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमॉक्रेटीक, सौ प्रवीणा लक्ष्मण भटकर—बहुजन मुक्ती पार्टी, समाजसेवक गजानन ओंकार हरणे ऊर्फ अण्णा—अपक्ष, अरुण मनोहर ठाकरे—अपक्ष, प्रवीण चंद्रकांत कौरपुरिया—अपक्ष, मुरलीधर लालसिंग पवार—अपक्ष, सचिन गणपतलाल शर्मा--अपक्ष असे एकूण ११ उमेदवार कायम आहेत.