Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:27 PM2019-04-03T15:27:38+5:302019-04-03T15:27:47+5:30

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे २ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक आहे.

Lok Sabha Election 2019: BJP ahead in election expenditure! | Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

googlenewsNext

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे २ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च करण्यात भाजपा उमेदवार सर्वात पुढे असल्याचे वास्तव आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, बसपाचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक)चे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष प्रवीण कौरपुरीया, अपक्ष मुरलीधर पवार व अपक्ष सचिन शर्मा इत्यादी उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या खर्च विषयक कक्षाकडे २ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चाच्या तुलनेत सर्वात जास्त खर्च भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा आहे. २८ मार्चपर्यंत संजय धोत्रे यांचा ८२ हजार ३९८ रुपये निवडणूक खर्च आहे, तर दुसºया क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा ३० मार्चपर्यंत ४४ हजार ६९० रुपये निवडणूक खर्च असून, तिसºया क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च ४१ हजार ३६ रुपये इतका आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च बघता, त्यामध्ये निवडणूक खर्च करण्यात भाजपा उमेदवार सर्वात पुढे असल्याचे दिसत आहे.

उमेदवारांचा असा निवडणूक खर्च!
उमेदवार                                   पक्ष               रक्कम
अ‍ॅड. संजय धोत्रे                      भाजपा          ८२३९८
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर                वंबआ        ४४६९०
हिदायत पटेल                      काँग्रेस            ४१०३६
बी. सी. कांबळे                      बसपा            १२६००
 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: BJP ahead in election expenditure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.