- राजेश शेगोकारअकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे उभ्या महाराष्टÑाचे लक्ष लागलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. काँग्रेसकडे असलेले पर्याय व राज्य पातळीवर ठरलेल्या रणनीतीमध्ये अकोल्याचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या क्षणापासून त्यांची उमेदवारी ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोशल मीडियावर ट्रोल करण्यापासून तर थेट उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी निदर्शने करण्यापर्यंत हा प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेस ‘बॅक फुट’वर असल्याचे चित्र मतदारसंघात आहे.अॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडीचे प्रयत्न संपल्यानंतर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात नवा प्रयोग करेल, अशी आशा काँग्रेससह विरोधकांनाही होती. संभाव्य उमेदवारांची नावे पाहून त्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली असती, तर त्यानुसार रणनीती ठरविण्याचे नियोजन भाजपा व वंचित बहुजन आघाडीचे होते; मात्र २०१४ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीची पुनरावृत्ती झाली आहे. तीन वेळा विजयी झालेले भाजपाचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर व गतवेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे काँग्रेसचे हिदायत पटेल पुन्हा एकदा रिंगणात आले आहेत.खरेतर अकोल्यात मुस्लीम समाजातील नेत्याला उमेदवारी देऊ नये, अशी विनंतीवजा सूचना येथील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमुखाने पक्षश्रेष्ठींकडे केली होती; मात्र तरीही पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पदाधिकाऱ्यांचा उत्साहच मावळला आहे. या पृष्ठभूमीवर पटेल यांची उमेदवारी ही भाजपाला जिंकविण्यासाठीच आहे, असा अपप्रचार करून त्यांच्या उमेदवारीला डॅमेज केले जात आहे. पटेल यांच्यामुळे मत विभाजन घडेल व वंचित बहुजन आघाडीला फटका बसेल, असे गणित मांडणारे मागील निवडणुकांची आकडेवारी व्हायरल करीत त्यांच्या उमेदवारीवर शंका उपस्थित करीत आहेत, तर भाजपाला थांबविण्याची घोषणा करणाºया काँगे्रसने नवा उमेदवार का दिला नाही, अॅड. आंबेडकरांवर मात करण्यासाठी मुस्लीम समाजाचा बळी का दिला जात आहे, असा रोष व्यक्त करीत त्यांची उमेदवारी भाजपाला पूरक असल्याचे सोशल मीडियावर पेरले जात आहे. या सर्व प्रकारामुळे पटेल यांची उमेदवारी डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असल्याने ते थांबविण्यासाठी काँग्रेसकडून ठोस भूमिका दिसत नाही, त्यामुळेच विरोधकांना आयताच मुद्दा हाती गवसला आहे.
आॅडिओ क्लिप व्हायरलपटेल यांच्यासोबत संवाद करणाºया व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोन मुस्लीम तरुणांनी त्यांच्याशी केलेल्या संभाषणात त्यांच्या उमेदवारीवर शंका उपस्थित करून थेट आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या ठिकाणावरून असे कॉल केले जात असून, अशा संभाषणांच्या क्लिप व्हायरल होण्याचे प्रमाण वाढत आहे.सोशल मीडियावरही अनेक पोस्टकाँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांपासून तर विरोधकांनीही सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकून पटेल यांची उमेदवारी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसला एकच भीती भाजपाचा लीड किती, अशा घोषणापासून तर एका कार्यकर्त्याने त्याच्या फेसबुकवर ‘झोपा’ हा एकमेव शब्द टाकून उमेदवारीवर शंका उपस्थित केली आहे.काँग्रेसने संधी गमावली...पण?राज्यात मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्यासाठी अकोल्याची निवड करतानाच अॅड. आंबेडकरांकडे वळणारी मतेही थांबविण्यासाठी काँग्रेसने पटेल यांची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत पटेल यांनी आंबेडकर यांच्यापेक्षाही जास्त मते घेतल्याचे उदाहरण या चर्चेसाठी बोलके आहे. मोदी लाटेतही पटेल यांनी काँगे्रसची व्होट बँक टिकवून ठेवली. त्यामुळे यावेळी काँग्रेसने धडा घेत या व्होट बँकेला इतर मतांची जोड मिळेल, असा प्रयत्न करणे गरजेचे होते. ती संधी काँगे्रसने गमावली; पण आताही काँग्रेस पक्षाची विचारधारा जिवंत ठेवत काम करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनोबल कायम ठेवण्यासाठी आपल्या उमेदवाराला केले जात असलेले ट्रोल व प्रतिमा डॅमेज करण्याच्या प्रयत्नांना उत्तर देण्याची गरज आहे.मोदी लाटेतही मी काँग्रेसकडून निवडणूक लढलो. दुसºया क्रमांकावर राहिलो, त्यामुळे पक्षाने मला पुन्हा उमदेवारी दिली. कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी स्वीकारली असून, माझी उमेदवारी जाणीवपूर्वक बदनाम केली जात आहे. विरोधक त्यांचे काम करीत आहेत, अनेकांचे बोलविते धनी कोण आहेत, हे माहीत आहे. मला त्यांच्या खोलात जायचे नाही. मी माझ्या कामाला लागलो आहे.
- हिदायत पटेल