- संतोष येलकर
अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.राज्यातील दुष्काळग्रस्त किमान २५ लोकसभा मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष्य असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी छावण्या आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे थंड बस्त्यात असून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यानुषंगाने दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन व डाळींच्या कमी झालेल्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या नाराजीतून लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा अंदाज तिवारी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघात कर्जमाफी, शेतीमालाचे भाव, दुष्काळी मदत यासह शेतकºयांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.शेतकरी-शेतमजुरांचे स्थलांतर; मतदानात होणार घट?दुष्काळी परिस्थितीत राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या किमान २५ मतदारसंघात शेतमालाचे हमी भाव, कर्जमाफी, दुष्काळी मदत व इतर शेतकºयांच्या समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या समस्या राज्यकर्त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन