- संतोष येलकर
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १५ लाख ८७ हजार २५७ मतदार असून, त्यामध्ये ३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ तरुण मतदारांची संख्या आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तरुण मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड इत्यादी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील १५ लाख ८७ हजार २५७ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये विविध वयोगटातील मतदारांची संख्या लक्षात घेता, एकूण मतदारांमध्ये ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ मतदार आहेत. त्यानुषंगाने लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांमध्ये सर्वाधिक संख्या असलेल्या तरुण मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्ह्यात वयोगटनिहाय असे आहेत मतदार!वयोगट मतदार१८ ते १९ २६,४५९२० ते २९ ३,०२,०४१३० ते ३९ ३,६५,६५३४० ते ४९ ३,३०,२३७५० ते ५९ २,४३,१४४६० ते ६९ १,५१,०६३७० ते ७९ ८३,४६८८० व अधिक ५३,७१५नवमतदारांच्या संख्येत होणार वाढ!जिल्ह्यात सध्या १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या २६ हजार ४५९ इतकी असली तरी, गत १ फेबु्रवारी ते १५ मार्चपर्यंत मतदार नोंदणीत १५ हजार २२९ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. २६ मार्चपर्यंत दुसरी पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नवमतदारांच्या संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.