Lok Sabha Election 2019 : अखेर काँग्रेस आघाडीची एकत्रित बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 03:39 PM2019-04-06T15:39:58+5:302019-04-06T15:40:03+5:30

अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती.

Lok Sabha Election 2019: A meeting of the Congress alliance finally! | Lok Sabha Election 2019 : अखेर काँग्रेस आघाडीची एकत्रित बैठक!

Lok Sabha Election 2019 : अखेर काँग्रेस आघाडीची एकत्रित बैठक!

Next

अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती. दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठकाच होत असल्याने कार्यकर्तेही संभ्रमित झाले, त्यामुळे अखेर एकत्रित बैठकीचा शुक्रवारी मुहूर्त निघाला. स्थानिक स्वराज्य भवनात पार पडलेल्या या बैठकीत प्रचार व निवडणूक नियोजनाचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी संवाद साधला.
अकोला लोकसभा निवडणुकीचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचार नियोजनाची यंत्रणाच कोलमडली असून, मित्रपक्षासोबतही समन्वय नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली होती. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राकाँमधील नेत्यांची समन्वय बैठक शांततेत व कुठलाही वाद तसेच कोणाचेही भाषण न होता संवाद स्वरूपात पार पडल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले आहे. अकोला मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांशी समन्वय साधून नियोजन करण्याची जबाबदारी पक्षाने अनंतराव देशमुख यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी शुक्रवारी नियोजनाची सूत्रे हाती घेत बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीला आमदार अमित झनक, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, ज्येष्ठ नेते संतोष कोरपे, कार्याध्यक्ष रफीक सिद्धिकी, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी माजी आमदार सुधाकरराव गणगणे, लक्ष्मणराव तायडे, अझहर हुसेन, नतिकोद्दीन खतीब, रमेश हिंगणकर, मदन भरगड, विजय कौसल, डॉ. नवीनचंद्र तिरूख, रमेशमामा म्हैसने डॉ. सुधीर ढोणे, राजेश भारती, प्रकाश तायडे, डॉ. जिशान हुसेन आदींसह दोन्ही पक्षाचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी एकत्र येत समन्वय ठेवत प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
 
उमेदवारीसाठी इच्छुकांचीही हजेरी
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेले डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर यांनीही बैठकीत हजेरी लावून आपली सक्रियता कायम असल्याचे प्रत्यंतर दिले.
 
अनंतराव देशमुख व अमित झनक एकत्र
वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात अनंतराव देशमुख व अमित झनक असे दोन गट आहेत. या दोन्ही गटांचे एकमेकांशी पटत नाही. नगरपालिका निवडणुकीतही हे गट समोरासमोर होते; मात्र लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांचे नेते एकत्र आल्याचे चित्र शुक्रवारच्या बैठकीत दिसले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: A meeting of the Congress alliance finally!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.