शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Lok Sabha Election 2019 : अखेर काँग्रेस आघाडीची एकत्रित बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 3:39 PM

अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती.

अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती. दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठकाच होत असल्याने कार्यकर्तेही संभ्रमित झाले, त्यामुळे अखेर एकत्रित बैठकीचा शुक्रवारी मुहूर्त निघाला. स्थानिक स्वराज्य भवनात पार पडलेल्या या बैठकीत प्रचार व निवडणूक नियोजनाचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी संवाद साधला.अकोला लोकसभा निवडणुकीचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचार नियोजनाची यंत्रणाच कोलमडली असून, मित्रपक्षासोबतही समन्वय नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली होती. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राकाँमधील नेत्यांची समन्वय बैठक शांततेत व कुठलाही वाद तसेच कोणाचेही भाषण न होता संवाद स्वरूपात पार पडल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले आहे. अकोला मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांशी समन्वय साधून नियोजन करण्याची जबाबदारी पक्षाने अनंतराव देशमुख यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी शुक्रवारी नियोजनाची सूत्रे हाती घेत बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीला आमदार अमित झनक, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, ज्येष्ठ नेते संतोष कोरपे, कार्याध्यक्ष रफीक सिद्धिकी, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी माजी आमदार सुधाकरराव गणगणे, लक्ष्मणराव तायडे, अझहर हुसेन, नतिकोद्दीन खतीब, रमेश हिंगणकर, मदन भरगड, विजय कौसल, डॉ. नवीनचंद्र तिरूख, रमेशमामा म्हैसने डॉ. सुधीर ढोणे, राजेश भारती, प्रकाश तायडे, डॉ. जिशान हुसेन आदींसह दोन्ही पक्षाचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी एकत्र येत समन्वय ठेवत प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले. उमेदवारीसाठी इच्छुकांचीही हजेरीकाँग्रेसकडून उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेले डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर यांनीही बैठकीत हजेरी लावून आपली सक्रियता कायम असल्याचे प्रत्यंतर दिले. अनंतराव देशमुख व अमित झनक एकत्रवाशिम जिल्ह्याच्या राजकारणात अनंतराव देशमुख व अमित झनक असे दोन गट आहेत. या दोन्ही गटांचे एकमेकांशी पटत नाही. नगरपालिका निवडणुकीतही हे गट समोरासमोर होते; मात्र लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांचे नेते एकत्र आल्याचे चित्र शुक्रवारच्या बैठकीत दिसले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक