- संतोष येलकर
अकोला: सतत बरसणाºया अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात कापणीला आलेली व कापणी झालेली खरीप पिके उद्ध्वस्त झाली. पावसामुळे भिजलेले सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आणि वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्याही सडल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, दिवाळीच्या कालावधीत शेतकऱ्यांवर अवकळा आल्याचे वास्तव आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमधील कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले आहे. काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, सोंगणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले आहेत. तसेच वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले असून, पीक लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने दिवाळीच्या कालावधीत शेतकºयांवर अवकळा आल्याचे वास्तव आहे.पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!- अवकाळी पावसाच्या तडाख्यात अकोला तालुक्यातील खरप बु. शिवारात शेतकरी संतोष चिंचोलकार यांच्या १७ एकर शेतातील कापणीला आलेले उभे सोयाबीन सडले आहे. सडलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याने, या पिकाच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही.-घुसर शिवारात एका शेतात कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले आहेत. तसेच याच गावाच्या शिवारात एका ९ एकर शेतातातील ज्वारी-बाजरी काळीभोर झाली असून, ज्वारी-बाजरीच्या कणसांना बुरशी चढली आहे.-धोतर्डी शिवारात शेतकरी रमेश गाडगे यांच्या शेतातील वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत व पात्या-फुलेही गळून पडली आहेत.
अवकाळी पावसाने माझ्या १७ एकर शेतातील सोयाबीन सडले आहे. पिकाचे उत्पादन पावसात बुडाल्याने, पीक लागवडीसाठी एकरी १५ हजार रुपयांप्रमाणे केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने एकरी २५ हजार रुपये मदत दिली पाहिजे.- संतोष चिंचोलकारशेतकरी, खरप बु. ता. अकोला.