लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसीमधील ‘लोकमत भवन’च्या प्रांगणात वितरण होत आहे. गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभार्यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. या सोहळय़ाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाबीजचे एम.डी. ओमप्रकाश देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गावाच्या विकासासाठी झटणार्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. सदर पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस व उत्सुकता आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणार्या सरपंचांसाठी ‘सरपंच ऑफ द ईयर’, असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण १३ पुरस्कार दिले जाणार आहेत.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा बुधवारी; सरपंचांची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 3:07 AM
अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसीमधील ‘लोकमत भवन’च्या प्रांगणात वितरण होत आहे.
ठळक मुद्देकार्याचा गौरव