शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’चे बुधवारी अकोल्यात थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता  लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड  केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ वाजता एमआयडीसीमधील लोकमत भवनमधील  हिरवळीवर या मानाच्या  अवॉर्ड्सचे वितरण होणार आहे.या सोहळ्याला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ...

ठळक मुद्देनिवड समितीने निवडले आदर्श सरपंच लोकमत भवन येथे रंगणार शेकडो गाव कारभार्‍यांच्या उपस्थितीत समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता  लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड  केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ वाजता एमआयडीसीमधील लोकमत भवनमधील  हिरवळीवर या मानाच्या  अवॉर्ड्सचे वितरण होणार आहे.या सोहळ्याला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर,  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. विलास भाले, महाबीजचे एमडी ओमप्रकाश देशमुख यांच्या उपस् िथतीत विजेत्या सरपंचांना अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे.  या पुरस्कार वि तरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उ पस्थित राहणार आहेत.गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभार्‍यांना ‘बीकेटी टायर्स  प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड्स-२0१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घे तला. गावाच्या विकासासाठी झटणार्‍या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा  हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘प तंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.  पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड चुरस आणि उ त्सुकता निर्माण झाली आहे.  सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन,  शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण,  प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी  करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख ने तृत्व’ व सर्वांगीण काम करणार्‍या सरपंचासाठी ‘सरपंच ऑफ द इयर’ असे दोन  स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण १३ पुरस्कार दिले जाणार आहेत. सुरुवातीला  जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिल्यानंतर या विजेत्यांचे राज्य पातळीसाठी नामांकन  होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार,  याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. 

पार्लमेंट ते पंचायत ‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अवॉर्ड्स सुरू केले  आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम  समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करीत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही  गौरवित आहे. राज्यात पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले आहे.

सोहळ्यात होणार मंथन सरपंच अवॉर्ड्सच्या जिल्हा पातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती  राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात  घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठय़ा संख्येने उपस्थित  राहणार आहेत. 

साक्षीदार व्हा!गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणार्‍या व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी  झटणार्‍या मेहनती व कर्तबगार सरपंचांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी  ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे, असे  आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे.

‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात  आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे  सर्वोच्च कायदे मंडळ असणार्‍या पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे.  तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी  देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आ पले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये  सर्वात महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह.

भारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता  आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले. ते शे तकर्‍यांपर्यंत पोहोचविले. शेतकर्‍यांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ  करण्यासाठी आम्ही ‘लोकमत’सोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला  आहे.- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन. 

लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून  आनंद झाला. असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत  आहे. बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला  फायदा झाला आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची  वाढत आहे.- राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्स.

टॅग्स :Akola cityअकोला शहरLokmat Eventलोकमत इव्हेंटsarpanchसरपंच