शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

लंडनच्या फेसबुक फ्रेंडचा महिलेला ५० लाखांचा गंडा   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:39 AM

अकोला : शहरातील एका ५४ वर्षीय महिलेची लंडन येथील इसमासोबत फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, लंडन येथील रहिवासी असलेल्या कंत्राटदाराने अकोल्यातील महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवली. मात्र, सदर वस्तू सोडवण्यासाठी महिलेला तब्बल ४८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. महिलेला फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाणे गाठले व पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लंडनच्या कंत्राटदाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. 

ठळक मुद्देफेसबुकवरील मैत्री भोवली, ‘गिफ्ट’च्या आमिषाला महिला बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील एका ५४ वर्षीय महिलेची लंडन येथील इसमासोबत फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, लंडन येथील रहिवासी असलेल्या कंत्राटदाराने अकोल्यातील महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवली. मात्र, सदर वस्तू सोडवण्यासाठी महिलेला तब्बल ४८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. महिलेला फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाणे गाठले व पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लंडनच्या कंत्राटदाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. रिंग रोडवरील विजय विद्युत कॉलनी येथील रहिवासी प्राजक्ता  फणसे ( ५४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राजक्ता यांनी फेसबुकवर एक कविता अपलोड केली होती. ती कविता बघून व्हिक्टर सॅम्यूअल नावाच्या व्यक्तीने प्राजक्ता यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. प्राजक्ता फणसे यांनी ती स्वीकारली. फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग सुरू झाले. मँचेस्टर लंडन येथे कॉन्ट्रॅक्टर असून, युनायटेड नेशनकरिता काम करीत असल्याचे व्हिक्टर सॅम्यूअलने या चॅटिंगद्वारे प्राजक्ताला सांगितले. या दरम्यान त्याने प्राजक्ता फणसे यांची इत्थंभूत माहिती घेतली. प्राजक्ता यांनी त्याला सर्व खरी माहिती दिली. एवढेच नाही तर, त्याला व्हॉट्स अ‍ॅप नंबरही दिला. त्यानंतर व्हॉट्स अ‍ॅपवरून मॅसेज येणे-जाणे सुरू झाले. २१ फेब्रुवारी रोजी व्हिक्टर सॅम्यूअलने प्राजक्ता यांच्या घरच्या पत्त्यावर एक गिप्ट पाठविले. सुरुवातीला प्राजक्ता यांनी गिफ्ट घेण्यास नकार दिला. मात्र, पुन्हा दोन दिवसांनी प्राजक्ता यांना कुरिअर कंपनीकडून व्हिक्टर सॅम्यूअल या नावाने पार्सल आल्याचे सांगण्यात आले. तसेच व्हिक्टर सॅम्यूअलने प्राजक्ता यांना फोन करून गिफ्ट स्वीकारण्याची विनवणी केली व एक हजार यूएस डॉलर भरून पार्सल सोडविण्याबाबत सांगितले. त्यानंतर प्राजक्ता सदर गिफ्ट स्वीकारण्यास तयार झाल्या. त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी ६८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. २६ फेब्रुवारी रोजी प्राजक्ता यांना कळवण्यात आले, की पार्सलमध्ये १ लाख ५० हजार पाउंड नगदी कॅश व सोन्याचे दागिने असल्याने कस्टमकडून विचारणा होत आहे. त्याकरिता ६ लाख ६८ हजार रुपये दंड भरावा लागेल. त्यावर प्राजक्ता यांनी वेगवेगळ्या अकाउंटमधून ६ लाख ६८ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवले. मात्र, हे पैसे पोहचत नाही, तोच पुन्हा पार्सलमध्ये असलेली रक्कम १ कोटी ४८ लाख रुपये वाढवून सांगण्यात आली व आयकर विभागाकडे १९ लाख ५० हजार रुपये भरण्याचे सांगितले. सदर रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल होऊन चौकशीची भीती दाखवण्यात आली. याच भीतीपोटी प्राजक्ता यांनी वेगवेगळ्या अकाउंटमधून आणखी १८ लाख ४१ हजार रुपये पाठवले. तोच पुन्हा कॅशचे कर्न्व्हशन चार्जेसपोटी आणखी ९ लाख ७४ हजार रुपये व अ‍ॅन्टी टेरीरिझम सर्टिफीकेटसाठी २५ लाख ८ हजार रुपये दिलेल्या अकाउंटवर पाठवण्याचे सांगितले, असे एकूण ४८ लाख ५१ हजार रुपये प्राजक्ता यांना वेगवेगळ्या अकाउंटमधून पाठवण्यास भाग पाडण्यात आले. यावरून प्राजक्ता यांनी सदर रक्कम तब्बल ५० लाख रुपये या लंडनमधील इसमास पाठविली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांना फसविणारे रॅकेट सक्रिययूएसए, यूके तसेच अन्य विदेशी देशांचे रहिवासी असल्याचे दाखवून मैत्री करण्यात येते. त्यानंतर मोठ्या विश्वासाने छायाचित्रांची देवाण-घेवाण करून विश्वास संपादन करण्यात येतो. यासाठी एक मोठे रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकमेकांवर विश्वास बसल्यानंतर विदेशातील व्यक्ती गिफ्ट पाठविल्याचे आमिष देते. तब्बल कोटींच्या घरात या गिफ्टची रक्कम सांगून भुरळ घातल्या जाते. त्यांच्या आमिषाला बळी पडताच कस्टम तसेच दहशतवादाचा धाक दाखवून, अशाप्रकारे रक्कम लुटण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकLondonलंडनAkolaअकोला