अकोला, दि. ३१ : महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये मलकापूर, शिवापूर, शिवणी व शिवर ही चार गावे औद्योगिक वसाहतीचे (एमआयडीसी) क्षेत्र वगळून समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे या तीन गावांचे नुकसान झाले; मात्र हद्दवाढीत समाविष्ट गावांचे हस्तांतरणासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेत एमआयडीसी कुंभारी ग्रामपंचायत अंतर्गत संलग्नित करण्याचे प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे कुंभारीला ह्यलॉटरी ह्ण लागणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.मनपाच्या हद्दवाढीमध्ये शहरानजिकची २४ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) वगळून शिवापूर, मलकापूर, शिवणी व शिवर ही गावे समाविष्ट करण्यात आली. हद्दवाढ होण्यापूर्वी या चारही गावांना ह्यएमआयडीसीह्ण पासून करापोटी उत्पन्न मिळत होते; परंतु मनपाच्या हद्दवाढीमध्ये औद्योगिक क्षेत्र वगळून चारही गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे ह्यएमआयडीसीह्णपासून या गावांना मिळणारे उत्पन्न आता मिळणार नसल्याने, या गावांचे नुकसान झाले. दरम्यान, मनपा हद्दवाढीमध्ये समाविष्ट २४ गावे मनपाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. त्यामध्ये ह्यएमआयडीसीह्ण क्षेत्र जवळच असलेल्या कुंभारी ग्रामपंचायत अंतर्गत संलग्नित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचा विचार सुरू झाला. हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाकडून मंजुरी मिळाल्यास ह्यएमआयडीसीह्ण कडून करापोटी कुंभारी गावाला उत्पन्नाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुंभारीला ह्यलॉटरीह्ण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चार गावांचे नुकसान; कुंभारीला ‘लॉटरी’?
By admin | Published: September 01, 2016 2:45 AM