परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पिंजर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्याने घरातील पंखे, टीव्ही आदी उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात दि.६, ७ व ८ मे रोजी कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
--------------------
तांत्रिक काम सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागतो. परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-देवीदास जाधव, मुख्य लाइनमन पिंजर
------------------------
पिंजर येथे अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
- नानाराव महल्ले पाटील, वीज ग्राहक, पिंजर.