- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सातपुडा पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या सदरपूरमध्ये १६२ मतदारांची संख्या असून, जिल्ह्यात सर्वात कमी मतदार असलेल्या या गावाची वाटदेखील खाचखळग्याची आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यातील सदरपूर हे गाव सातपुडा पर्वतरांगांपासून जवळच आहे. जवळपास २०० ते २२५ लोकसंख्या असलेल्या सदरपूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोली क्र.१ मध्ये एकच मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रांतर्गत गावातील १६२ मतदार आहेत. जिल्ह्यातील सर्वात कमी मतदारांची संख्या या गावात आहे. तेल्हाऱ्यापासून सदरपूर या गावाकडे जाणाºया रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. सर्वात कमी मतदार संख्या असलेल्या या गावापर्यंत जाणे-येणे करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गावात जाण्यासाठी खासगी वाहनांचाच ग्रामस्थांना वापर करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी मतदारांची संख्या असलेल्या या गावाची वाट खाचखळग्याची असल्याचे वास्तव आहे.तेल्हाºयापासून ३० कि.मी. अंतरावर आहे गाव!अकोला जिल्ह्यातील तेल्हाºयापासून ३० किलोमीटर अंतरावर सदरपूर हे गाव आहे. पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात जिल्ह्यातील मतदारांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे १६२ मतदारांशी संख्या असून, लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत या गावातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अकोला लोकसभा मतदारसंघात अशी आहे मतदारांची संख्या!विधानसभा मतदारसंघ मतदारअकोट २८०८४४बाळापूर २९१७७९अकोला पश्चिम ३२८५२२अकोला पूर्व ३३८५४७मूर्तिजापूर ३१८८५२रिसोड २९९४०७.......................................................एकूण १८५७९५१