शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मा जिजाऊंच्या लेकीची सुवर्ण भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 2:39 AM

आयएसएसएफ ज्युनियर विश्‍चषक नेमबाजी स्पर्धेत हर्षदाला सुवर्णपदक.

अशरफ पटेलदेऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. २३ - तालुक्यातील देऊळगावमही येथील गरीब कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्‍चषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले. आंतरराष्ट्रीय शुटिंग स्पोर्ट फेडरेशनद्वारे अजरबैजान येथे पार पडलेल्या स्पर्धेत हर्षदा निठवेने महिलांच्या १0 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात यशस्विनी देवसाल आणि मलायका गोएलसोबत सुवर्णपदकाची कमाई केली. देउळगावमही येथील रहिवासी असलेले सदानंद अप्पा निठवे खानावळीचा व्यवसाय करतात. त्यांना मिळणार्‍या अल्पशा मिळकतीतून संसाराचा गाढा ओढत असताना त्यांनी हर्षदाला क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहित केले. हर्षदा निठवे हिने जिद्दीच्या बळावर आजपर्यंत अनेक शुटिंग पिस्तूल स्पर्धांमध्ये ५५ पदके प्राप्त केली आहेत. १९ सप्टेंबर रोजी अझरबैजानमधील गाबेल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हर्षदाने सांघिक गटाच्या अंतिम फेरीत ११२२ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाचा बहुमान प्राप्त केला. या स्पर्धेत हर्षदा महाराष्ट्र युवा संघाचा नेतृत्व करीत आहे. तसेच संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील एमजीएममध्ये अद्ययावत शुटिंग रेंजचा सराव करीत आहे. तसेच एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी हर्षदा यांच्या सरावासाठी नि:शुल्क व्यवस्था करून दिली. नवी दिल्ली येथे झालेल्या आठव्या आशिया स्पर्धेमध्ये शुटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक आणि सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते.