आशिष गावंडे / अकोला : महापालिकेचे चारही क्षेत्रीय अधिकारी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करीत, सहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा पदभार काढण्यासाठी क्षेत्रीय अधिकार्यांनी तत्कालीन आयुक्तांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप, मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. पठाण यांनी जिल्हाधिकार्यांना पाठवलेले पत्र ह्यलोकमतह्णच्या हाती लागले असून, मनपा वतरुळात या पत्राचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेत साहाय्यक आयुक्तपदी रुजू झालेल्या माधुरी मडावी यांच्याकडे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी उपायुक्त सामान्य प्रशासन विभागाचा पदभार सोपवला होता. त्यांच्यावरील प्रशासकीय कामकाजाचा ताण लक्षात घेता, आयुक्त शेटे यांनी मडावी यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा पदभार काढून घेतला. विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सामान्य प्रशासन विभागाचा पदभार पुन्हा एकदा माधुरी मडावी यांच्याकडे देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना ६ ऑगस्ट रोजी पत्रव्यवहार केला होता. मडावी यांच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कारभारामुळे चारही भ्रष्ट क्षेत्रीय अधिकार्यांनी एकत्र येऊन आयुक्त शेटे यांच्यासोबत अर्थव्यवहार केला आणि मडावी यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा पदभार काढला, असा आरोप पठाण यांनी या पत्रामध्ये केला होता. शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सत्ताधारी ह्यजीआयएसह्ण प्रणाली लागू करण्यासाठी आग्रही होते. याकरिता प्रशासनाला सुमारे आठ कोटी रुपये अदा करावे लागणार असल्याने मडावी यांनी ३२५ कर्मचार्यांचा ताफा घेऊन मालमत्तांची मोजणी सुरू केली. शहरातील बड्या हॉटेल व्यावसायिकांना मडावी यांनी दंड आकारला. संबंधित हॉटेल व्यावसायिक महापौर व उपमहापौर यांचे निकटवर्तीय असल्याने मडावी यांचा पदभार काढण्यासाठी सत्ताधार्यांनीदेखील पुढाकार घेतल्याचा आरोपही पठाण यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मनपाला प्राप्त झाले असून, या पत्राने महापालिका वतरुळात खळबळ उडणार आहे.
आर्थिक व्यवहारातून काढला मडावींचा पदभार
By admin | Published: October 03, 2015 2:38 AM