महाआवास अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलामध्ये प्रथम क्रमांक कुटासा, द्वितीय आलेवाडी, तृतीय सावरगावने पटकाविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जि.प. सर्कल चोहोट्टा बाजार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रथम ग्रामपंचायत, लोहारी खुर्द, द्वितीय ग्रा.पं. गुल्लरघाट, तृतीय ग्रा.पं. मक्रमपूर, सर्वोत्कृष्ट घरकुलमध्ये प्रथम वस्तापूर, द्वितीय रंभापूर सावरा, तर तृतीय मुंडगावला मिळाला आहे. पुरस्कार वितरणाला आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती लताताई नितोने, जि.प. सदस्य गजानन पुंडकर, प्रकाश आतकड, नायब तहसीलदार हरीश गुरव, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, पं.स. सदस्य धीरज सिरसाट, विष्णू येऊल, मुरलीधर खोटे, नितेश तायडे, हिरालाल कासदेकर, वैशाली राऊत, सपना झ्यासकर, पार्वती जामुनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक विष्णू झामरे, तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी गजाननराव सावरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी जे.टी. नागे, प्रशासन अधिकारी भालेराव, विस्तार अधिकारी बनसोड, खेडकर, संतोष झामरे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
----------------
बार्शीटाकळी येथेही पुरस्काराचे वितरण
शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत बार्शीटाकळी तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. २१ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला पं.स.चे सभापती प्रकाश वाहुरवाघ, गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, हिरासिंग राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू काकड, युवा मोर्चाचे योगेश कोदनकर, जि. प. सदस्य गोपाल भटकर, झळके, गणेश बोबडे, रायसिंग राठोड, पं. स. सदस्य रोहिदास राठोड, रामदास घाडगे, दादाराव पवार, राहुल गायकवाड, संतोष लोखंडे, जावेद भाई, विलास गोरले, गजानन मानकर, अशोक कोहर, विठ्ठल वाघ, गजानन लुले, प्रमोद भाकरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.