अकोला : बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरीता बँक ऑफ महाराष्ट्रतील सर्व कर्मचारी संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनच्या झेंड्याखाली एकत्र येत ९ व १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात दोन दिवसीय संप पुकारला आहे. या अनुषंगाने अकोला शहरात गुरुवार, ९ फेब्रुवारी रोजी विशाल मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजी कॉलेज शाखा येथून रॅलीला सुरुवात झाली. रेल्वे स्टेशन चौक, टॉवर चौक, मुख्य डाक घर, अग्रसेन भवन ते महात्मा गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेपर्यंत येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी हातात मागण्यांची फलके घेऊन निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे श्याम माईणकर, प्रविण महाजन, अतुल वर्मा, प्रबोध घिर्णीकर, प्रवीण कुटारिया, गौरव इंगोले,प्रजय बंसोड, रितेश गावंडे, सागर खवले, जितेंद्र येळमे, अविनाश आखरे, सतीश धुमाळे, विशाल गायकवाड, अनिल मावळे, अनिल बेलोकर, शुभांगी मानकर, शिल्पा ढोले, ओलिविया सरकार, स्वाती पवार, पुनम अग्रवाल, सतेज ढोक यांच्या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.फोटो आहे.