अकोला: लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, यावर्षी शेतकऱ्यांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. मे महिन्यात बीटीचे पॅकेट शेतकऱ्यांना बाजारात मिळणार आहेत.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करू न महाबीजने बीटी कापूस विकसित केला. बोंडअळी व रस शोषण करणाºया किडींना प्रतिकारक्षम हे वाण असून, राज्यातील अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्ये या वाणाचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेण्यात आले. तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविलेले दोन्ही वाण बीटीने प्रवेश केल्यानंतर मात्र मागे पडले. याच दोन्ही संकरित वाणांमध्ये जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनाला यश आले असून, यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. यासाठीची मंजुरी केंद्रीय वाण प्रसारण समितीने दिली असल्याची माहिती कापूस संशोधक डॉ. के. एस. बेग यांनी दिली.
पीकेव्ही-हायब्रीड-२ व नांदेड-४४ या संकरित कापूस वाणात जनुकीय बदल करू न (बीटी जीन टाकून) बीटी-२, बीजी-२ कपाशीचे वाण विकसित करण्यात आले आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध केले जाणार आहेत. विपणन व उत्पादन महाबीज घेणार आहे.- रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक, विपणनमहाबीज, अकोला.